सायन येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची ही अधिकृत वेबसाईट आहे. भाविकांना श्रीपांडुरंगाची,श्रीरुक्मिणीमातेची महत्वाची परंतु थोडक्यात अशी माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

श्री विठ्ठल
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.

आमच्या बद्दल
१२५+ वर्षांचा इतिहास
श्री विठ्ठल रखुमाईची स्थापना प्रथम सुमारे १८६७-६८ साली शीव मुंबई येथे झाली. कालांतराने भाविकांची वर्दळ वाढु लागल्यावर कायमस्वरूपी देऊळाची कल्पना पुढे आली व नविन देऊळाचे बांधकाम होउन सघ जागेच्या ठिकाणी (फाल्गुन शुद्ध द्वादशी शालिवाहन शके १८१४ सोमवार, दि. २७ फेब्रुवारी १८९३) रोजी “श्री” च्या मुर्तिची या आधी मंदिरातील नित्य उपचारासाठी स्थापना झाली.
आषाढी एकादशी महत्त्व
सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.
कार्यक्रम
अमावस्या :
दीप पूजन – मंदिरातील सर्व समया घरात पाटावर ठेवून त्यांची पूजा
