Welcome

सायन विठ्ठल मंदिराबद्दल

मुंबई मधील “प्रतिपंढरपूर” – मा. सोनोपंत दांडेकर सुमारे १६५ वर्षापूर्वी ई. स. १८६३ साली ह.भ.प. सदाचार संपन्न श्री. श्रीधर दामोदर खरे (श्रीधर महाराज ) कोकणातुन मुंबईत आले. तेव्हा त्याकाळच्या मुंबईची हद्द असलेल्या शीव (सायन) येथे विश्रांतीसाठी शांळाले होते तत्यांची सदाचार धार्मिक परमार्थिक ओढ असलेली वृत्ती भावून  ग्रामस्थांनी त्यांना शीव येथे वास्तव्य करण्यास विनविले तेव्हां त्यांनी ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन वास्तव्य स्विकारले व श्री विठ्ठल रखुमाईची स्थापना प्रथम सुमारे १८६७-६८ साली शीव मुंबई येथे केली. कालांतराने भाविकांची वर्दळ वाढु लागल्यावर कायमस्वरूपी देऊळाची कल्पना पुढे आली व नविन देऊळाचे बांधकाम होउन सघ जागेच्या ठिकाणी (फाल्गुन शुद्ध द्वादशी शालिवाहन शके १८१४ सोमवार, दि. २७ फेब्रुवारी १८९३) रोजी “श्री” च्या मुर्तिची या आधी मंदिरातील नित्य उपचारासाठी स्थापना झाली.
-श्रीधर महाराजांनी पंढरपुरातील श्री रुक्मीणी मातेचे पुजारी ह. भ. प. श्री पंढरीनाथ उत्पात यांस पाचारण केले व शीव येथील श्री विठ्ठल मंदिरात पहाटे काकड आरती पासुन रात्री शेजारती पर्यंत दैनंदिन नित्य उपचार श्री क्षेत्र पंढरपुर प्रमाणेच आजतागायत चालु आहेत. गुरू-शिष्य परंपरा या भावनेतुन आजही उत्पात कुटूंषियांची ४/५ पिढी कार्यरत आहे. मंदिरातील नंदादिपासाठी कायम स्वरूपी सोय असावी
यासाठी श्री वासुदेव व रामकृष्ण बळवंत सोमण या बंधुंनी मंदिरातील आवारात चाळ बांधून दिली. ३५ वर्षापुर्वी मंदिराचे गर्भागृह तसेच अभादित ठेवुन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. आजमितीस आषाढी कार्तिकीस भाविकांची अलोट गर्दी होत असते तसेच देव देवतांचे जन्मोत्सव सणही मोठया प्रमाणात साजरे होत असतात. गुरुवार, एकादशी, द्वादशीस मंदिरातील नित्य भजने होत असतात व मंदिरात इतर भाषिक श्रद्धावान मंडळीचीही नित्य भजने, किर्तन, प्रवचन आदी उपक्रम चालु असतात.
मंदिरात पंढरपुरा प्रमाणे नामदेव पायरी, गरुड, हनुमान, श्रीगणेश, शीव पार्वती, दत्त, मारूती आदी
परिवार देवता आहेत. दीपमाळ, गरुडखांब, वडपिंपळ, चंद्रभागे प्रमाणे मोठी विहीर आवरात आहे. याच साठी ह.म.प. कै. सोनोपंत दांडेकर यांनी या मंदिराची ओळख “मुंबईतील पंढरपुर” अशी केलेली आहे.
सणासुदीस वस्त्रालंकार, पोषाख, वसंतऋतु प्रित्यर्थ चंदन उटी उपचार तर पहाण्यासारखे असतात. हजारो भाविक आवर्जुन भेट देत असतात. कार्तिक पोर्णिमा व फाल्गुन शुद्ध द्वादशीस (मूर्ती स्थापना दिवस) म्हणुन “श्री” ची पालखी मिरवणुक गावातील मंदिरातुन व गावातुन फिरून येत असते यात अनेक भाविक सामिल होत असतात. सध्या मंदिराची विविध सत्संग, भजन इत्यादी उपक्रमास जागासुद्धा कमी पडत असते. तेव्हा मंदिराचा पुनःश्च
जीर्णोद्धाराचा संकल्प विश्वस्तानी केला आहे.
OUR RULES

Before Visiting Temple Learn Protocols

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Cras ac gravida nisi. Phasellus vel tellus ante. Quisque ac dolor at nunc malesuada viverra non et purus. Pellentesque finibus lectus ac justo tincidunt, vitae consectetur arcu maximus. Sed ac tristique elit, eget bibendum ipsum. Phasellus sit amet elementum dolor, et viverra ante. Duis vel bibendum ipsum. Vivamus est dui, sagittis id elementum nec, semper congue sapien.

Vivamus bibendum lobortis ex, in molestie lorem interdum nec. Fusce posuere faucibus dapibus. Sed vestibulum, urna in posuere venenatis, felis metus laoreet massa, nec ullamcorper ante leo in metus. Nam ultricies suscipit risus. Duis malesuada, libero sed elementum molestie, nibh metus volutpat diam, quis viverra mi erat vitae augue. Etiam accumsan, nibh at venenatis pretium, mi tellus consequat purus, quis posuere mauris risus eu nisi. Praesent efficitur sagittis posuere. Etiam cursus congue ligula non fermentum. Aliquam sed tellus at nulla hendrerit ultrices id a tortor. Class aptent taciti sociosqu ad litora torquent per conubia nostra, per inceptos himenaeos.

Scan & Donate