Programs

Monthly Rituals

चैत्र प्रतिपदा – गुढीपाडवा – गुढी उभारणे, देवाला विशेष अलंकार / पोशाख

शुद्ध नवमी – श्रीराम नवमी – दुपारी १२.४० वाजता रामाचा पाळणा / जन्म त्या आधी तासभर जन्मांचे पोथी वाचन – देवाला विशेष अलंकार / पोशाख
शुद्ध एकादशी – देवाला चंदनाची उटी
पौर्णिमा – हनुमान जयंती , सूर्य, दयाला पहाटे पोथीवाचन, सायंकाळी शीव येथील हनुमान मंदिराची पालखी येते
वाद्य एकादशी – चंदनाची उटी – विशेष दर्शन

शुद्ध तृतीया – अक्षय तृतीया – परशुराम जयंती – सूर्यास्ताला पोथी वाचन, परशुराम जन्म, देवाला विशेष अलंकार/पोशाख
शुद्ध एकादशी  – चंदनाची उटी विशेष दर्शन लाभ चुकवू नये
शुद्ध त्रयोदशी – नृसिंह जयंती – सूर्यास्ताला पोथी वाचन नृसिंह जन्म
वद्य एकादशी – चंदनाची उटी विशेष दर्शन लाभ चुकवू नये
पौर्णिमा वटपौर्णिमा शिव गावातील सुवासिनींची वटपूजा सकाळी नऊ ते दुपारी एक
आषाढी एकादशी प्रसिद्ध व्यक्तीच्या हातून श्री विठ्ठल रखुमाईची महापूजा पहाटे पाच वाजता दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी
अमावस्या दीप पूजन मंदिरातील सर्व समय घरात पाटावर ठेवून त्यांची पूजा
प्रत्येक सोमवारी रात्री साडेसात वाजता शंकराची पूजा आरती
वद्य प्रतिपदा ते वद्य अष्टमी – अखंड नाम सप्ताह मंदिरात २४ तास नामस्मरण एक विशिष्ट टाळ सात दिवस 24 तास चालू असते हा उत्सव मूर्ती स्थापनेच्या ही यादी जवळजवळ 130 वर्षाहून अधिक चालू आहे.
अष्टमीला रात्री अकरा वाजता असून श्रीकृष्ण जन्माचे अभंग व रात्री बारा 12.40 पाळणा / जन्म दुसऱ्या दिवशी नवमीला सकाळी 11 पासून दही काल्याचे अभंग, गोपाळांचे खेळ, व दुपारी एक वाजता दहीहंडी. दही काल्याचा प्रसाद व अखंड नाम सप्ताह समाप्ती या उत्सवानंतर पूर्वी गाव जेवण मंदिरातर्फे दिले जाई आता शक्य नसल्याने भक्तांना लाडू प्रसाद दिला जातो.